Monday , April 20 2026
Breaking News

एअरमन पदी निवड झाल्याबद्दल प्रथमेश आजरेकर यांचा  माजी विद्यार्थी मंडळातर्फे सत्कार

Spread the love
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालय, शाळेचा माजी विद्यार्थी प्रथमेश भास्कर आजरेकर याची भारतीय हवाई दलात एअरमन पदी निवड झाली आहे त्यानिमित्त मोहनलाल दोशी विद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि कष्ट या जोरावर प्रथमेशने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर व्हाॅलीबॉल खेळात नावलौकिक मिळवला होता. त्यानंतर त्यांने भारतीय हवाई दलात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल संभाजी पाटील, दोशी विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक एस. आर. सोनाळकर, एस. एम. खांडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथमेशचे वडील भास्कर आजरेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी मंडळाचे संचालक डॉ. उत्तम पाटील, संचालक निहाल पटेल, संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रथमेश आजरेकर म्हणाला, माझे आई-वडील, काका आणि शाळेतील शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने हे यश मिळाले आहे. कष्टाला कोणताही शॉर्टकट नाही. पण प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते. त्यामुळे तरुणांनी भारतीय सैन्यदलामध्ये सामील होऊन देशाची सेवा करण्याचे व्रत स्वीकारावे, असे आवाहन त्याने केले.
प्रारंभी मंडळाचे सचिव रमेश देसाई प्रास्ताविक केले. संचालक  नामदेव चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी अभिजीत घोडके, पवन व्हडगे, डॉ. मुकुंद पाटील, नवनाथ पाटील यांच्यासह आजरेकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *