
माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित समाजाला जाणार “रायगड भूषण” पुरस्कार दिलीप सखाराम उभारे यांना देण्यात आला रविवार दि. 06 मार्च 2022 रोजी अलिबाग येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी दिलीप उभारे यांच्या धर्मपत्नी सौ. स्नेहल उभारे याही उपस्थित होत्या. यावेळी माणगांव येथील उभारे यांचे हितचिंतक, मित्रपरिवार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर वालगुडे, देशमुख, भामरे, जायभाये, चितळे, वडेकर, काळे, रेणुका तसेच आमचे रायगड जिल्हा प्रतिनिधी पत्रकार श्री. नरेश पाटील आदींनी श्री. उभारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि सत्कारमूर्ती उभारे यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
“रायगड भूषण” चे मानकरी दिलीप उभारे यांनी गेली 25 वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. समाजातील अनेक गरजूना योग्य मार्गदर्शन केले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचा नेहमी सहभाग असतो. अनेक संघटनेमध्येही सक्रीय सहभागी असतात. त्यांनी अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे.
दिलीप उभारे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना उभारे म्हणाले की, माझ्या यशाचे भागीदार माझे कुटुंबीय, मित्रमंडळी व माझे सहकारी आहेत, त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज या पुरस्काराचा मानकरी ठरलो आहे. यापुढेही माझे कार्य असेच चालू राहील अंतिम ध्येय गाठण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असू असेही ते म्हणाले. रायगड जिल्हा शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून लवकरच दिलीप उभारे यांचा भव्य असा सत्कार समारोह आयोजित येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण वालगुडे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta