Friday , November 22 2024
Breaking News

“हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!

Spread the love

 

मुंबई : शनिवारी (१३ मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड दिला आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी विविध हिंदू मुद्द्यांवर मतं मागण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अगदी हिजाब बंदीपासून, बजरंग बली, बजरंग दल आणि मुस्लीम आरक्षण हटवणे, अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. असं असूनही या निवडणुकीत धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे फारसे चालले नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं.

दरम्यान, अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी एक ट्वीट केलं आहे. “असं वाटं हिंदू कुंभकर्णाचे बाप आहेत. जागेच होत नाहीत,” असं शरद पोंक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. पोंक्षे यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता काही ट्विटर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची ही प्रतिक्रिया कर्नाटक निवडणुकीशी जोडली जात आहे. यावर शिवसेनेशी संबंधित असणाऱ्या अनुज म्हात्रे नावाच्या एका ट्वीटर वापरकर्त्याने शरद पोंक्षेंना उद्देशून म्हटलं की, “अच्छा म्हणजे जनतेने काँग्रेसला निवडून दिले तर ते झोपलेले हिंदू? नशीब देशद्रोही म्हटलं नाही.”

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *