मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर प्रशांत दामले बहुमताने निवडून आले. नाट्य परिषदेवर रंगकर्मीचे वर्चस्व निर्माम झाले असून प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झालीय. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी घोषणा केली. काही क्षणात याबद्दलची अधिकृत्त घोषणा होईल.
प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चुरस रंगली होती. पण प्रसाद कांबळी यांना मागे टाकत प्रशांत दामले हे बहुमताने निवडून आले.
Belgaum Varta Belgaum Varta