Sunday , December 14 2025
Breaking News

शिंदे गटात कुरबुरी, पण गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद : संजय राऊत

Spread the love

 

मुंबई : शिंदे गटात कुरबुरी आहेत. पण गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद असतील. फक्त पैशाला महत्त्व देणाऱ्यांसाठी आमचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार नाहीत. महाराष्ट्रात लवकरच ‘खोका स्टोरी’चा सिनेमा येणार, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारला टोला लगावला. देशासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, फुटलेल्या गटामध्ये नाराजी, अस्वस्थता आहे. शिंदे गटामध्येही आणखी दोन गट पडले आहेत. भाजप शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक द्यायचं. भाजप म्हणजे अजगर किंवा मगर. भाजपसारख्या मगरीपासून दूर जाणे योग्य.

कीर्तीकर शिंदे गटात जाऊनही आनंदी नाहीत. शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या प्रश्नावर काम करण्यास अपयशी ठरलं. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच कोरेगावात दंगल उसळली. नक्षलवाद्यांच्या नावाखाली चुकीच्या लोकांना अटक झाली. आता मला फडणवीसांची किव येते. सरकारच्या अपयशामुळे शहरी नक्षलवाद वाढला, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
द कश्मीर फाईल, द केरल स्टोरी चित्रपटांचा संदर्भ देत संजय राऊत यांनी शिंदे-भाजपवर निशाणा साधला आहे. आम्हीही लवकरच ‘द डायरी ऑफ खोका सरकार’ सिनेमा आणतोय असा उपरोधिक टोमणा संजय राऊत यांनी मारला.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *