Share
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसुन येत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील हाच दावा केला.
मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असं संजय राऊतांनी म्हंटलं होतं. त्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रीया देताना या चर्चांचं खंडन केलं आहे. तर शिवसेनेत सध्या हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिंदे गटाच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची काल रात्री महत्त्वाची बैठक बोलावली. वरळीतील एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती.

Post Views:
1,159
Belgaum Varta Belgaum Varta