Wednesday , March 4 2026
Breaking News

उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे १६ ठिकाणी छापे

Spread the love

 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईत १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सुरेश चव्हाण यांच्या ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.

बीएमसी कोविड घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने मुंबईतील १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांचा समावेश आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आयएएस संजीव जयस्वाल, खासदार संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रासह १४ जणांच्या ठिकाणी ईडीची झडती सुरू आहे.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि संजय राऊत यांचे जवळचे मित्र सुजित पाटकर यांच्या घरावरदेखील ईडीने छापेमारी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *