नागपूर : साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची नावे चर्चेत होती. त्यातून अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. याच बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार झाला असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta