सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांनी आज सकाळी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश होणार आहे. यानिमित्त केसीआर हे आपल्या मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह सोमवारपासून दोन दिवसीय सोलापूर शहर- जिल्हा दौऱ्यावर आहेत.
केसीआर सोमवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास हैदराबादहून सुमारे ३०० गाड्यांचा ताफा शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात दाखल झाले होते. सोलापुरात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. आज केसीआर यांनी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यानंतर सरकोली येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta