मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरु असतानाच महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप आजच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. सोबत राष्ट्रवादीला सहकार, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय ही खाती देखील राष्ट्रवादीच्या पदरात पडणार असल्याचं समजतं.
एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं आजच खातेवाटप होणार असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्यांनी कोणती खाती मिळू शकतात?
कोणत्या मंत्र्यांना कोणते खातं मिळण्याची दाट शक्यता?
अजित पवार – अर्थ विभाग
दिलीप वळसे पाटील – सहकार
छगन भुजबळ – कृषी
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
हसन मुश्रीफ – अल्पसंख्यांक
धर्मराव अत्राम – परिवहन
अनिल भाईदास पाटील – अन्न नागरी पुरवठा
अदिती तटकरे – महिला बाल कल्याण
संजय बनसोडे – क्रीडा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ विभागासह ऊर्जा खातं मिळवण्यासाठी आग्रही होती. मात्र ऊर्जा खातं मिळत नसल्याने शिवसेनेकडील (शिंदे गट) कृषी खातं देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta