Wednesday , March 4 2026
Breaking News

जयंत पाटील, राजेश टोपे, प्रसाद तनपुरे, मानसिंग नाईक अजित पवार यांच्या गोटात!

Spread the love

 

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा दुसरा हादरा बसणार आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्रसाद तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते.

जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चार आमदारांचा प्रवेश झाल्यानंतर आव्हाड यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रोहीत पवार हे तीन आमदार मुळ राष्ट्रवादीमध्ये राहतील, असे बोलले जाते. पक्षातील सर्वच नेत्यांनी सिमोलंघन केल्यामुळे रोहीत पवारसुद्धा शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अजित पवार गटाची सॉफ्ट भूमिका आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *