Monday , December 8 2025
Breaking News

साईदर्शनाला जाताना वाटेत काळाचा घाला, चार भाविकांचा मृत्यू, ८ महिन्यांचा चिमुकला बचावला

Spread the love

 

सोलापूर : साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील असल्याचे माहिती समोर आली आहे. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय ५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हिरेमठ (वय ३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शारदा दिपक हिरेमठ (वय ७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

मृत हे कर्नाटक राज्यातील

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक साईच्या दर्शनासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील सालसेकडून तवेरा गाडी क्र. के. ए. ३२ – एन. ०६३१ ने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर क्र. आर. जे. ०६ जी. सी. २४८६ हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावने सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उपडी पडली.

भीषण अपघाताच्या आवाजाने गावातील युवक बचावकार्याला धावून आले

तवेरा आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने जोरात आवाज झाला. अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर चारचाकी एका अंगावर करून जखमींना बाहेर काढले. प्रसंगावधान राखून या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून मदतकार्य सुरू ठेवले. अपघातात श्रीशैल चंदेशा कुंभार (वय-५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय-५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हिरेमठ (वय-३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला तर शारदा दिपक हिरेमठ (वय-७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

सदर अपघातात गाडी ड्रायव्हर श्रीकांत राजकुमार चव्हाण (वय २०, गुलबर्गा) हा किरकोळ जखमी झाला असून केवळ आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *