Monday , December 8 2025
Breaking News

मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह आझाद मैदानात गुलाल उधळणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Spread the love

 

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या सगसोयऱ्यांवर आजच (26 जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. मराठा जमाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. ही बैठक तब्बल साडे तीन तास चालली.

हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त मुंबईमध्ये दाखल
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड विशेष विमानाने मनोज पाटील जरांगे यांना जीआर संदर्भात बोलण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त आर्दड आणि भांगे पोहोचतील.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *