

माणगांव (नरेश पाटील) : शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुधवार दि. 30 मार्च रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. माणगांव शहरात शिवसेतर्फे जाहीर मेळावा होत आहे. हा मेळावा दुपारी 3.00 वाजता टिकमभाई मेहता वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणात पार पडणार आहे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गीते, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, रायगड जिल्यातील शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, दक्षिण रायगड शिवसेना पक्ष अध्यक्ष अनिल नावगणे, जिल्हा प्रमुख पदाधिकारी, सर्व जिल्हा ता.अध्यक्ष शिवसेना नेते राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, तसेच जिल्हा चिटणीस डॉ. संतोष कामेरकरसह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.
ना.आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. 28 मार्च रोजी सिंधुदुर्ग, 29 मार्च रत्नागिरी येथे तर दि. 30 रोजी रायगड जिल्ह्यातील लोणेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात इकोबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जातीजमातीच्या मुलींचे वसतिगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून त्यानंतर माणगांव येथील मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची पूर्ण तयारी शिवसैनिकांनी केली असल्याची डॉ. संतोष कामेरकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे वार्तालाप करताना सांगितले. तसेच शहरात ठिकठिकाणी बॅनर, स्वागत कमानी आणि भगवे झेंडे लावलेले पाहायला मिळत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta