Tuesday , December 3 2024
Breaking News

सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Spread the love

 

जालना : मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आरक्षण टिकावं म्हणून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे.

जरांगे सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर ठाम
जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आम्ही सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

…तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही – जरांगे
”ज्यांच्या कुणबी नोंदी सापडकयत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सग्यासोयऱ्याचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं जरांगेंनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना द्यावेच लागेल, मात्र मागासवर्गीय अहवाल घेऊन ते आरक्षण देताला, मात्र ते चालणार नाही, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्या शिवाय कोणाला सोडणार नाही. मागासवर्ग आयोगाचे पण राहु द्या, ज्यांना नकोय त्यांना जोर जबरदस्ती नाही. 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. आंतरवलीसह सर्व गुन्हे मागे घ्या. 20 तारखेपर्यंतच मी उपोषण करत असतो, सरकारनं सरकारचं धोरण ठरवलं आहे, मराठे मराठ्यांचे धोरण ठरवणार आहेत. मागासवर्गीय आयोग, सग्यासोयऱ्यांचे आणि कुणबी या सर्वच बाजूने मराठयांना आरक्षण मिळणार”, असं जरांगेनी म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

Spread the love    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *