Wednesday , March 4 2026
Breaking News

महायुती जागावाटपावर अंतिम निर्णय शक्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने आज दिल्ली गाठणार

Spread the love

 

कोल्हापूर : राज्यात जागावाटपावरून महायुतीमध्ये ठिणग्यांवर ठिणग्या पडत असतानाच आज (8 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली गाठणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचीमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांना तत्काळ दिल्लीला बोलवलं असून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, एका मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोनशीलांचे उद्घाटन केले.

पुढील दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
जागा वाटपाबाबत दिल्लीत आज रात्री महायुतीतीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमध्ये अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *