Wednesday , April 22 2026
Breaking News

मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचे थाटात उद्घाटन!

Spread the love

 

बेळगाव : मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी सादर केलेल्या सुमधुर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करून श्रीफळ महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भुजंग चव्हाण यांच्या प्रस्ताविक भाषणानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पूष्प व लेखनी देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर व श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ प्रमुख उमेश कुऱ्याळकर यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचे पूजन करून इंडियन ऑईल डेपो मॅनेजर श्री. अक्षय ओस्वाल यांनी फित कापून उद्घाटन केले. प्रयोगशाळा पाहून शाळेसाठी अक्षय ओस्वाल यांनी स्मार्ट टीव्ही देण्याचे जाहीर केले.

उद्घाटनानंतर श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने 40 गरजू विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मागील वर्षी 7वी परीक्षेत प्रथम, द्वितीय क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने व कन्नड शिक्षिका गीताराव यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ बक्षिसे दिली. त्यानंतर काही मान्यवरांची भाषणे झाली प्रमुख वक्ते श्री. प्रमोद वसुलकर यांनी आईवडील व विज्ञान यांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अनेक उदाहरणे देऊन सांगितले. शेवटी शाळेचे अध्यक्ष श्री. शांताराम कुपटगीरी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पूजन केले. या भावनिक प्रसंगाच्या वेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले व धन्य झाले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी पाटील, उपाध्यक्षा काशव्वा कांबळे, सदस्य कविता गुरव, विद्या मनवाडकर, पंकज घाडी, शिक्षक संघाच्या अध्यक्षा पूजा पाटील, खजिनदार बंजत्री, सीआरपी प्रिया चोपडे, शाळेचे सदस्य जोतिबा काळसेकर, विनोद पाटील, शंकर पाटील, प्रशांत पाटील, मारूती आरगु, सातेरी ओऊळकर, जानकी जाधव, सर्व महिला सदस्या, व्ही. एन. गावडे, एस एन मुचंडीकर, पाटील टिचर व 180 हुन अधिक पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. जी. निलजकर सर व आभार प्रदर्शन प्रणाली गुरव टीचर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *