मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्यानं हा पेच आता दिल्लीतच सुटणार अशी चिन्ह दिसत आहेत. लवकरच महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक पार पडणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा असणार आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी काही जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. आता यावर तोडगा दिल्लीतच निघणार आहे. आता दिल्लीत महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असून याच बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
कोणत्या जागांचा तिढा अजूनही कायम?
दक्षिण मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई
उत्तर मध्य मुंबई
रत्नागिरी -सिंधुदुर्ग
ठाणे
धाराशिव
गडचिरोली
भंडारा – गोंदिया
अमरावती
परभणी
सातारा
नाशिक