
अहमदनगर : मांजरीला वाचवताना 5 जणांचा विहीरीत बनवलेल्या शोष खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.
नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी हा शोषखड्डा बनवण्यात आला होता. यामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये 9 एप्रिल रोजी घडली होती.
नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या एकाला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, इतर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मांजर शोषखड्ड्यात पडली होती. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला, तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. विहिरीतील विषारी वायूने गुदमरून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
गावकऱ्यांनी शोष खड्ड्यात बुडालेल्या एकाला बाहेर काढलं होतं. त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी नेवासा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही व्यक्ती बायोगॅसच्या खड्ड्यात असलेल्या गॅसमुळे चक्कर येऊन बुडाल्याची माहिती मिळत आहे. अन्य 5 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. आपत्कालीन यंत्रणा नसल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता. आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे. माणिकराव गोविंद काळे, (वय 65), संदीप माणिक काळे (वय 36), अनिल बापूराव काळे (वय 58), विशाल अनिल काळे (वय 23), बाबासाहेब पवार (वय 35) हे सहा जण शेणाचा शोषखड्डा विहिरीमध्ये अडकले होते. त्यातील पाच लोकांचा जागेवर गुदमरून मृत्यू झाला. तर विशाल काळेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta