Friday , November 22 2024
Breaking News

कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले, मतदान केंद्रात घुसून तरुणाचा धुडगूस

Spread the love

 

नांदेड : राज्यभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाहीये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना चिंता लागली आहे. मतदार घराबाहेर पडले नसल्याचं चित्र आहे. मात्र, असं असतानाच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची कुऱ्हाडीने तोडफोड केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या तोडफोडीची घटना घडल्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण पसरलं. मतदान केंद्रावर मतदानही थांबवण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका शाळेच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. आज सकाळी या मतदान केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान सुरू होतं. लोकांनी मतदानासाठी रांगाही लावल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, दुपारी अचानक एक तरुण मतदान केंद्रात घुसला आणि अचानक त्याने छोट्या कुऱ्हाडीने मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनवर प्रहार करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मतदान केंद्रावरील मतदार आणि अधिकारी भयभीत झाले. मतदारांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर अधिकाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुणालाही बधला नाही.

अन् पोलिसांनी ताब्यात घेतलं
या तरुणाने छोट्या कुऱ्हाडीने मशीनवर एकामागोमाग एक प्रहार करणं सुरू ठेवलं. त्यामुळे मशीनची तोडफोड झाली. दोन मशीन, कागदपत्रे खाली पडली. सर्व सामान अस्तव्यस्त पडलं. मशीनची तोडफोड सुरू असल्याची माहिती मिळताच मतदान केंद्रावरील पोलिसांनी तात्काळ मतदान केंद्रात धाव घेतली आणि मशीनची तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक केली. भय्यासाहेब एडके असं या तरुणाचं नाव आहे. त्याने या मशीन का फोडल्या? या मागे कुणाचा हात आहे काय? तो कुठल्या पक्षाशी संबंधित आहे काय? तो राहतो कुठे? काय करतो? याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्याने ही कुऱ्हाड लपवून आणली होती असं सांगितलं जातं.

मशीन तात्काळ बदलल्या
दरम्यान, रामतीर्थ मधल्या एका मतदानकेंद्रावर एका तरुणाने एव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मशिनचा बाह्य भाग जरी डॅमेज झाला असला तरी केलेल्या मतदानाची आकडेवारीचा डाटा सुरक्षित आहे. पोलिसांनी सबंधित तरुणला अटक केलेली आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी मशीन बदलण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *