Friday , September 13 2024
Breaking News

लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडर स्फोटात 6 जणांचा मृत्यू

Spread the love

 

दरभंगा : बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर ब्लॉकमधील अंटोर गावात ही घटना घडली. गावात लग्नसमारंभ होता. यावेळी लोक लग्नात फटाके फोडत होते. याच दरम्यान, फटाक्यांच्या ठिणगीमुळे घराला आग लागली. काही वेळातच आग इतकी पसरली की ती विझवणे कठीण झाले.

आग घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचली आणि काही वेळाने सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.

सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

आयएएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त

Spread the love  नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *