मुंबई : मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली. घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग
दरम्यान, घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच वडाळामध्ये सुद्धा पार्किंग टॉवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दोन मोठ्या दुर्घटनांसह मुंबईत इतर ठिकाणी सुद्धा झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अवघ्या तासाभरामध्ये मुंबईत हाहाकार झाला. मुंबई महापालिकेकडून 40 बाय 40 स्क्वेअर फुट होर्डिंग परवानगी असताना तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यामुळे ही परवानगी दिली तरी कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अॅडव्हर्टायझिंग कंपनीला होर्डिंग्ज लावताना वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सुद्धा दाखल करण्यात आला होता.
अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित
दरम्यान, घाटकोपर घटनेमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार शंभरहून अधिक लोक या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. होर्डिंग्ज कोसळल्यानतंर युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. त्यामुळे गॅस कटरचा पर्याय सावधपणे वापरला जात आहे. महाकाय होल्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आहे ते अनधिकृत असल्याचे समोर आलं आहे. त्या होर्डिंग्जला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमधील हजारोंनी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास होर्डिंग्ज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर रुग्णवाहिका सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आठ ते दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
वडाळ्यात पार्किंग टाॅवर कोसळला
दरम्यान, घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच वडाळामध्ये सुद्धा पार्किंग टॉवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बरकत आली नाका या ठिकाणी श्रीजीवी टॉवर वडाळा पूर्व या ठिकाणी घडली. यामध्ये सुद्धा अनेक गाड्या खाली सापडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका गाडीमध्ये एक मनुष्य होता, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.
माननीय। भारत सरकारने च आता आशा, होर्डिंग दूर्घटनाच्या वरील प्रतीबंधासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्रच्या होर्डिंग काढून टाकण्यासाठी सक्ती करावी.