Friday , April 11 2025
Breaking News

पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; ५ महिला जागीच ठार

Spread the love

 

पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर – कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले. या सर्व महिला या कटफळ येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

About Belgaum Varta

Check Also

दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह

Spread the love  प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *