Saturday , October 19 2024
Breaking News

गुणरत्न सदावर्ते आता कोल्हापूरला पोहोचणार; पोलीसांना मिळाला ताबा

Spread the love


कोल्हापूर : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलीसांना मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता सातार्‍यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता कोल्हापूरला आणण्याची प्रक्रिया सुरु होईल.
मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मराठा समाज आणि मागासवर्गीय समाज यांच्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाज समन्वयक समितीचे दिलीप मधुकर पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी संबंधित तक्रार अर्जावर ज्येष्ठ विधिज्ञ व विधी अधिकारी यांचा अभिप्राय घेऊन सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरुन मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकविणे तसेच चिथावणीखोर वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण केल्या प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 27 जून 2019 रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या निकालाविरुध्द नापसंती दर्शवली होती. त्यांच्या निर्णयावर शंका घेऊन निकाल देणारे न्या. रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत, असे म्हणून त्यांची जात काढून, मराठे हे शुद्र आहेत, अशी भाषा वापरली होती. न्या. रणजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ऐकून त्यांच्या दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने सेटींग-बेटींग करुन निकाल दिला आहे, असाही आरोप सदावर्ते यांनी केला होता.
जाणीवपूर्वक न्यायाधीशांविषयी जातीय व्देषातून अवमानकारक भाषा वापरुन न्यायमूर्तींची बदनामी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाचे न्याय निर्णयावर संशय घेऊन ओबीसी जाती, खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण, वैश्य, आर्य या जातीमध्ये तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ए. बी. व्ही. पी. संघटना यांच्यात व मराठा समाजामध्ये जातीय व्देष निर्माण होऊन तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. सार्वजनिक शांतता भंग होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य करुन मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केला. या प्रकरणी सदावर्ते यांच्याविरुध्द योगेश पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *