सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु जमीन हादरल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं समोर आलंय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला आहे. या धक्क्यामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्र बिंदु वारणावतीपासुन ८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही, असं धरण प्रशासनाने सांगितलं आहे. पहाटेची वेळ आणि निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. या धक्क्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
चांदोली धरण परिसरात जमिन हादरली
मागील काही दिवसांपासून सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे. चांदोली धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे, असं असतानाच हा भूकंप झालाय. धरणातून पाण्याचा विसर्ग होत असताना भूकंपाचे हादरे आज पहाटे जाणवले. त्यामुळे नदीकाठील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु हा भूकंप सौम्य स्वरूपाचा होता, त्यामुळे धरणास कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानेस्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta