Sunday , September 8 2024
Breaking News

18 लाख वारकऱ्यांनी घेतले विठुरायाचे दर्शन; दानपेटीत कोट्यवधींचा निधी जमा

Spread the love

 

मुंबई : यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 09 लाख 53 हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून 28 कोटी 92 लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे. तर, यंदाच्या विक्रमी आषाढी यात्रेत विठूरायाची तिजोरी भरली असून मंदिराच्या खजिन्यात तब्बल 8 कोटी 34 लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 कोटी रुपये जास्त जमा झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यावर्षी आषाढीला १८ ते २० लाख भाविक आल्याने पंढरपूर ओव्हरपॅक झाले होते.
यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. 5 हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळ्या ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळ्यासाठी एसटीकडून 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर, पायी व विविध वाहनांतून यंदा आषाढीला 18 ते 20 लाख भाविक आल्याने पंढरपूर ओव्हरपॅक झाले होते. सर्व ठिकाणी झालेला समाधानकारक पाऊस, ठिकठिकाणी उरकलेलं शेतीची कामे यामुळे यंदा खूप मोठ्या संख्येने भाविक आषाढीसाठी आले होते. याचाच परिणाम म्हणून देवाच्या तिजोरीत गेल्यावेळी पेक्षा 2 कोटी रुपये जास्त जमा झाले आहेत. संपन्न झाली. दरम्यान, आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै असा होता. यात्रेमध्ये मंदिर समितीला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

अशा स्वरुपात मिळाला निधी
श्रींच्या चरणाजवळ रू. 77 लाख 6 हजार 694 /- , भक्तनिवास रू. 50 लाख 60 हजार 437, देणगी रू. 3 कोटी 82 लाख 26 हजार 828, लाडूप्रसाद रू. 98 लाख 53 हजार, पूजा रू. 3 लाख 99 हजार 209, सोने भेट रू. 17 लाख 88 हजार 373 , चांदी भेट रू. 2 कोटी 3 लाख 65 हजर 228 व इतर रू. 3 लाख 64 हजर असे एकूण रू. 8 कोटी 34 लाख 84 हजार 174 असे उत्पन्न देवाच्या तिजोरीत जमा झाले आहे. आषाढी सोहळ्याच्या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन व मुखदर्शन अनुक्रमे सुमारे 4 लाख 83 हजार 523 व 6 लाख 5 हजार चार असे एकूण 10 लाख 88 हजार 527 इतक्या भाविकांनी घेतल्याचेही राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी

Spread the love  सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर गायब असलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *