Tuesday , September 17 2024
Breaking News

यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या

Spread the love

 

नवी मुंबई : यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. दाऊद शेख व्यतिरिक्त याप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीतून समोर आलेल्या फुटेमध्ये हत्या झाली त्या दिवशी यशश्री शिंदे हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत होती. तिच्या पाठोपाठ अवघ्या 10 मिनिटांतच दाऊद शेख जाताना दिसला होता.

दाऊद शेख याचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तब्बल सात पथकं तयार केली होती. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना दाऊदच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. यशश्रीची हत्या झाल्यानंतर दाऊद फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते, परंतु दाऊद शेख सातत्याने लोकेशन बदलत होता. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमध्ये पकडले आहे.

आणखी एक आरोपी ताब्यात
उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे. मोहसिनला पुढील चौकशीकरता महाराष्ट्रात आणले जाणार आहे. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्ड्सवरुन एका नंबरवर तिचं सातत्यानं बोलणं होत असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि तो नंबर ज्याच्या नावावर होता, त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या हाती यश आलं असून पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *