Monday , December 8 2025
Breaking News

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना महाराष्ट्रात “काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार”

Spread the love

 

पणजी : रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली महाराष्ट्र ‘सप्ताह फुलांचा’ या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल तसेच
रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. त्यात फोंडा गोवा रहिवासी, एकमेव गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्यचे संस्थापक) यांनी पण काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल गोव्यातील साहित्यप्रेमींकडुन आनंद व्यक्त करित अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. हा नामवंत पुरस्कार प्राप्त केलेल्यात गोव्यासहीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यातील साहित्यिकांचा समावेश आहे. नम्रता खरे, मुंबई, खेमदेव हस्ते, केशव वामनराव डफरे, वैशाली जगताप बोरसे, धुळे, डॉ.सौ. मीनाक्षी नरेंद्र निळेकर, माजलगाव, सौ. प्रगती पाताडे, ओरोस, डॉ गीता वाळके, नागपूर, अनुराधा जोशी, अंधेरी, सुमन ताई मुठे नासिक, नवनाथ रामकृष्ण मुळवी,फोंडा-गोवा, सौ. शोभा प्रकाश कोठावदे, मुंबई, लीलाधर दवंडे, नागपूर, सुभाष अनंतवार (तात्या) नाशिक, हर्षा भुरे, भंडारा, सौ. पुष्पा निलकंठ येवलकर, नाशिक, सौ. तृप्ती भंडारे, नालासोपारा, स्मिता सुहास भीमनवार, पुणे, विठ्ठलराव खोटरे (देवर्डा) अकोला, सौ.सिमा मंगरुळे तवटे, वडूज, सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर,नाशिक, प्रा. मन्नाडे रमा धनराज, लातूर, श्री. अशोक महादेव मोहिते, बार्शी, श्री पांडुरंग एकनाथ घोलप, रोहोकडी, शिवाजी खाशाबा सावंत,पुणे, सौ.सुलभा दिपकराव गोगरकर, अमरावती, सौ.सारिका लाठकर, नांदेड, सुजाता उके,नागपूर, संदीप भुक्कन पाटील, खिडकाळी, माधुरी अमृतकार, नाशिक,सरोजनी करजगीकर,परभणी, गिरीश भट, पनवेल, संगीता घोडेस्वार, चंद्रपूर, गवाजी बळीद, अहिल्यानगर, विमल बागडे, नाशिक, कल्पना पवार, मुकुटबन, साधना ब्राम्हणकार, मालेगाव, वैजयंती गहूकर,चंद्रपूर, दिलीप देशपांडे, बीड, सुजाता एन. अवचट, गडचिरोली, पद्माकर वाघरूळकर, छ. संभाजीनगर, वासुदेवराव सोनटक्के, अकोला, ओंकार राठोड, दारव्हा यवतमाळ, स्वरा संदेश गमरे, मुंबई,संगीता जामगे, गंगाखेड, कमलताई साळवे, बुलढाणा, चिरंजीव बिसेन, गोंदिया,श्रीमती उषा.ज.कांबळे, कोथरूड पुणे, उमेश बाऱ्हाटे, परभणी आणि सुवर्णा तावरे, वीटा
अशा तब्बल ४९ साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.रचना प्रकाशन साहित्य समुह प्रशासन समितितील मा.देविदास गायकवाड (परीक्षक), मा.दिनेश मोहरील (निरीक्षक), मा.वंदना मडावी (प्रशासिका), मा.सुजाता उके. (प्रशासिका), मा.सुनिता तागवान (संस्थापक/ग्राफिक्स) आणि मा.डाॅ.प्रा.शिलवंतकुमार मडावी (मार्गदर्शक) यांनी सर्व साहित्यिकांचे अभिनंदन करून पूढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *