नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. यासंदर्भातील बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. मात्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला असून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसल्याचं सांगत पक्षाकडून यासंदर्भातील वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यासंदर्भातील बातम्या असत्य आहेत आणि खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी नाना पटोले हेच राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta