पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर काही दिग्गज नेत्यांनी थेट ईव्हीएम मशीन आणि निवडणुकांवर संशय व्यक्त केला. तर दुसरीकडे या निवडणुकीत पैशांचा भरपूर वापर करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आरोप केला. त्यानंतर ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीवर संशय व्यक्त करत समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलना सुरुवात केली. गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव हे उपोषणावर बसले होते. त्यानंतर आज शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं आहे.
बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमची विनंती आहे. तुम्ही आत्मक्लेश करुन घेऊ नका. आपण एक आहोत, हे देशभर दिसले पाहिजे. आपण महाविकास आघाडीमार्फत हे आंदोलन राज्यभर नेले पाहिजे’.
‘महाराष्ट्र लेचापेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे येईल. मला विश्वास आहे की, आम्ही रस्त्यावर येऊ. बाबा आढाव यांनी बाकीचे आंदोलन पुढे नेऊ. बाबा मी तुमच्याकडे हट्ट करतो. तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘मला बाबा आढाव यांचा एक विषय आवडला आहे. तो म्हणजे अदानी यांचा. मला भीती वाटतेय. फुले वाडा यांचा सुंदर परिसर आहे. ही जागा देखील अदानी यांना देतील. मुंबई अदानी यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेमुळे मुंबई वाचली आहे’.
‘तीन दिवसांपासून सुरु असलेले आत्मक्लेश उपोषण बाबा दिवस यांनी थांबवले आहे. बाबा आढाव यांच्याबरोबर या उपोषणास सहभागी झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील उपोषण थांबवले आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta