Tuesday , March 3 2026
Breaking News

उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

Spread the love

 

नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भेटीवर अंधारे यांची प्रतिक्रिया

या भेटीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्या अनेक समस्या आहेत. बीडचं प्रकरण गाजत आहे, परभणीमध्ये देखील आंदोलन सुरू आहे, असे विविध विषय आहेत. फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून न पाहाता संस्था म्हणून पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जे प्रश्न आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे फडणवीसांना भेटले असतील तर त्यात चुकीच काय आहे? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी या भेटीवर केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *