
सोलापूर : नव्या वर्षाचे राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी मंदिरात जाणे पसंत केले. नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जात असताना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ अपघात झाल्याचे समजतेय. मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta