बीड : एसआयटीच्या तपासात संतोष देशमुख हत्याबाबत मोठा पुरावा मिळाला आहे. हत्येसाठी कोणकोणती हत्यारे वापरली याची माहिती सीआयडीच्या चौकशीतून समोर आली आहे.
एक गॅसचा पाईप ज्याची लांबी 41 इंच असलेली, त्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर कळया करदुडयाने गुंडाळून मुठ तयार केलेली तसेच एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मुठ असलेला पाईप त्यात लोखंडी तारेच 05 क्लच वायर वसवलेले, अशी हत्यारे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना वापरले. यासोबतच लाकडी दांडा, तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड व कोयता, लोखंडी फायटर, धारदारकत्ती यांचा हत्येसाठी वापर करण्यात आला.
तपासादरम्यान यातील काही गोष्टी पोलिसांना सापडल्या
तपासादरम्यान एक गॅसचा पाईप, 05 क्लच वायर बसवलेले एक लोखंडी गोलाकर मुठ, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लॅस्टीक पाईपचे तुकडे, मयताचे गळयातील पंचरंगी जाड धागा, स्कॉर्पीओ, स्वीफ्ट, 05 मोबाईल पोलिसांना मिळाले.
सीआयडीला आणखी काय मिळालं नाही?
तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड व कोयता, लोखंडी फायटर, धारधारकत्ती हे हत्यारे सीआयडीच्या हातू अजून लागलेले नाही.
Belgaum Varta Belgaum Varta