Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

Spread the love

 

मुंबई : काँग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना गेले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तसेच गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे सहकारी ते मानले जातात. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्य पदाच्या शर्यतीत अनेक नावे होती. यामध्ये कोल्हापूरचे सतेज पाटील, लातूरचे अमित देशमुख, सांगलीचे विश्वजित कदम यांची नावे देखील होती. मात्र, अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्याच गळ्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.

सामाजिक क्षेत्रातील योगदान
1) गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण
2) सर्वोदय विचारांवर आधारीत राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे
3) ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान
4) जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी.
5) आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण

राजकीय क्षेत्रातील योगदान
1) विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
2) जेष्ठ पक्ष निरिक्षक – ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
3) राष्ट्रीय सचिव- अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली- सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश -पंजाब (दहा वर्ष)
4) राष्ट्रीय उपाध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
5) माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद बुलढाणा (1999 ते 2002)
6) माजी विधान सभा सदस्य- 22 बुलडाणा विधानसभा (2014 ते 2019)
7) माजी सदस्य- जिल्हा परिषद बुलढाणा (1997 से 2006)
8) शिबिर समन्वयक- गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ.कमिटी द्वारा आयोजन)
9) पक्ष निरिक्षक- अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
10)माजी उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची संक्षीप्त कारकीर्द
तरुण वयापासूनच ते गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी घेतली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *