Monday , December 8 2025
Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पदवीत्तर शिकवण्यात यावा : साहित्यिक अर्जुन जाधव यांची मागणी

Spread the love

 

मुंबई : अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याचा संपूर्ण इतिहास माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी ते पदवीत्तर अभ्यासक्रमात शिकवण्यासाठी समाविष्ट करण्यात यावा.अशी मागणी साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा, धाडसीपणाचा, शासन व प्रशासन कौसल्याचा इतिहास फक्त इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना झाली कित्येक वर्षे शिकवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास फक्त इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असणार्या विद्यार्थी- विद्यार्थीनी शिकवण्या इतका लहान नाही आहे. त्याचा इतिहास खूप मोठा, विशाल, प्रेरणादायी, आदर्शवादी, शासन, प्रशासन यांचा अभ्यास करण्यासारखा असून जगापुढे कला, कौशल्य, बुद्धीमत्ता, न्याय निवाडा याचा कस लावणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास इयत्ता चौथीच्या वर्गापुरता मर्यादीत न ठेवता तो माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदवीत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करून तो शिकवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराज याचे उत्तुंग कार्य बालमनावर जसे संस्कार करते तसे तरूणपिढीवर, तरूण मनावर संस्कार करणारे आहे. आजच्या तरूणपिढीला छत्रपती शिवाजी महाराज याचा खरा व सत्य संपुर्ण इतिहास माहिती व्हायला हवा. काही राजकीय लोक, अभिनेते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोईनुसार सत्य इतिहासाची मोडतोड, चिरफाट करून महाराजांना बदनाम करत आहेत. ते वेळीच थांबायला हवे. महापुरूषाची बदनामी करू पाहत असलेल्या माथेफिरुना कायदयाचा वेळीच धाक दयायला हवा. महापुरूषाचा खरा इतिहास वाचत आपल्या देशातील तरूणपिढी घडत राहील. मीमोठ्या तळमळीने छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहासाचा प्रस्ताव आपणाकडे पाठवत आहे. येत्या मंत्रीमंडळ कॅबिनेटमध्ये या प्रस्तावावर त्वरीत निर्णय घेण्यात यावा आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी आणि पदवीत्तर अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास या वर्षांपासून शिकण्यासाठी समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री अर्थात महाराष्ट्र सरकारकडे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *