मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले, त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटिल कारस्थान कुणी करीत असेल तर स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांना खडसावले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट होते; पण याही परिस्थितीत शेती, उद्योग, गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले आहे. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान राखले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …