
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी झाली. पोलीस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाबाहेर आणत असताना शिवप्रेमी त्याच्या अंगावर धावून गेले. पण त्याचवेळी सर्तक असलेल्या पोलिसांनी रोखलं. म्हणून पुढची अप्रिय घटना टळली.
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी सुद्धा सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली. प्रशांत कोरटकरने ज्या मोबाईल फोनचा वापर केला, तो आता पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्याचा जो प्रवास झाला, त्याला कोणी-कोणी मदत केली? ते पोलिसांना शोधून काढता येईल. पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. ज्या-ज्यावेळी पोलिसांना तपासात आवश्यक असेल, तेव्हा सहकार्य करु असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. पण कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Belgaum Varta Belgaum Varta