Monday , December 8 2025
Breaking News

अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले; सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बीड : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला. तसचे जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *