Wednesday , December 10 2025
Breaking News

मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे मी आभार मानतो : राज ठाकरे

Spread the love


मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्यभरात सुरू असलेल्या गदारोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे आभार मानले आहेत. ’महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी आज सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. या मशिदी चालवणार्‍या मौलवींचे मी खास आभार मानतो, कारण आमचा विषय त्यांना नीट समजला आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले.
’माझ्यासह पक्षातील इतर नेत्यांना आज सकाळपासून राज्यभरातून फोन येत असून परिस्थितीची माहिती दिली जात आहे. पोलिसांनी पक्षाच्या अनेक पदाधिकार्‍यांना नोटीस पाठवली आणि ताब्यातही घेतलं आहे. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होत आहे, एवढाच माझा प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करत आहेत, त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि जे कायद्याचं पालन करत नाहीत, त्यांना तुम्ही मोकळीत देणार,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला.
’विश्वास नांगरे पाटलांचा मला फोन आला होता…’
मला मुंबईचा जो रिपोर्ट आला आहे, त्यानुसार शहरात 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यातील 135 मशिदींवर सकाळची अजान 5 वाजण्याच्या आतमध्ये लावली गेली. काल मला आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की आमचं मौलवींशी बोलणं झालं आहे आणि ते सकाळी भोंग्यांवरून अजान लावणार नाहीत. मग या 135 मशिदींवर कारवाई होणार का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
’आंदोलन सुरूच राहणार’
राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं मनसेचं आंदोलन आगामी काळातही कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ’मी सांगितलं होतं की भोंगे खाली उतरवा, पोलिसांना एकच काम आहे का रोज डेसिबल मोजायचं? लोकांनी हेच करायचं का? तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती करा, मात्र माईक आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? त्यामुळे हे भोंगे खाली उतरवले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही, यावर निर्णय लागत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *