
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————–
——————————————————————–
पंढरपूर : आषाढी वारीत राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. तर नुकत्याच संपन्न झालेल्या यंदाच्या आषाढीच्या पंढरीत आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणी तब्बल १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात २ कोटी ३५ लाख ४९ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. २८ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी विठुरायाच्या चरणीवर विविध स्वरुपात दान अर्पण केले आहे.
२ कोटी ५९ लाखांचे दागिने अर्पण
वारी काळात विठुरायाच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण करण्यात आले आहेत. तर २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगीच्या स्वरुपात मंदिर समितीला मिळाले आहेत. १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपयांची देणगी हुंडी पेटीतून मिळाली आहे. तर ३२ लाख ४५ हजार ६८२ रूपये परिवार देवतांच्या देणगी पेटीतून मिळाली आहेत. २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये किंमतीचे सोने- चांदीचे दागिने अर्पण केले आहेत.
तसेच ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्रीतून मिळाले आहेत. ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्त निवासाच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे. इतर काही उपक्रमांच्या माध्यमातून १२ लाख ४५ हजार ७५ रुपये मंदिर समितीला मिळाले आहेत. याशिवाय ३ इलेक्ट्रिक रिक्षा व एक बसच्या मध्यमातून ३२ लाख इतके उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta