Monday , December 15 2025
Breaking News

विधानभवनाच्या लॉबीतील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच जितेंद्र आव्हाड यांचे ठिय्या अन्…

Spread the love

 

मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी काल (17 जुलै) रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केले. यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा
दरम्यान, विधानभवन परिसरात सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी पोलीसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली. तर यावेळी आव्हाड हे थेट पोलिसांच्या कार समोर ठिय्या देत होते. यावेळी त्यांनी कार रोखून धरली असता पोलिसांनी अक्षरक्ष: त्यांना फरफटत बाहेर ओढले. त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवले. तर दुसरीकडे गपचूप दुसरी गाडी बोलावून कार्यकर्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी आमदार आव्हाडांनी हे पाहिलं आणि परत राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील हजार होते.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *