
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली असून आता नुकत्याच एका पत्रकार परिषदेत तिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल असे वक्तव्य केलं आहे. गोरखपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेत तो दहशतवादी नसल्याचे म्हटले आहे.
ममता कुलकर्णी पुढे म्हणाली की, “बॉम्बस्फोट किंवा कोणत्याही कटात त्याचे नाव कधीच समोर आले नाही. मीडिया आणि राजकीय शक्तींनी अनेक वर्षांपासून दाऊदला चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडलंय.” गोरखपूरला पोहोचलेल्या ममताने तिथे बाबा गोरक्षनाथ मंदिरात पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. नव्वदच्या दशकांत हिंदी चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेली ममता आता अध्यात्मिक आयुष्य जगत आहे.
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णी चांगलीच चर्चेत आली होती. या पदावरून वाद झाल्यानंतर तिला राजीनामासुद्धा द्यावा लागला होता. त्याच्या दोन दिवसांनंतर पुन्हा तिला महामंडलेश्वरचे पद देण्यात आले. ममता कुलकर्णीचं नाव आता यमाई ममता नंदगिरी असे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta