
मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत आरोपांचा सपाटा लावला. त्यांनी अजित पवार यांना विनंती करत धनंजय मुंडेंना पक्षात ठेवू नये, असी विनंतीही केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असून, माझ्याकडे ऑडिओ क्लिपसह सर्व पुरावे आहेत,’ असा थेट दावा जरांगे यांनी केला आहे. आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडीने अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप मुंडेंवर त्यांनी केला. आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग, मेसेज आणि इतर पुरावे असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी सरकार आणि पोलिसांकडे केली आहे. जरांगे यांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वळण लागले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta