Tuesday , March 3 2026
Breaking News

अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात गुन्हा दाखल, गावकऱ्यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

Spread the love

 

मुंबई : मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध मैनपुरीतील भोगांव येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप यात आहे. या 12 लोकांमध्ये श्रेयस तळपदेसोबतच अरविंद त्रिपाठी, संजय मुदगिल, पंकज अग्रवाल, समीर अग्रवाल, अजय श्रीवास्तव, आरके सेट्टी, शबाब हुसेन, सुप्रिया, नरेंद्र नेगी, अनुज जैन आणि सानिया अग्रवाल यांचा समावेश आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 10 फेब्रुवारीला तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार भोगांव येथील मोहल्ला मिश्राणा या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने केली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

सर्व प्रकरणाचा पोलीस तपास घेत आहेत. शहरातील मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या शाखेतमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केला असल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. यात त्याचे साथीदार सहभागी होते.

नेमकं प्रकरण काय?
2015 मध्ये सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी एलयूसीसी बँकेची शाखा उघडली. यात शेकडो लोकांनी / गावकऱ्यांनी गुंतवणूक केली. कालांतराने नागरिकांनी पैसे मागितले तेव्ह समीर-सानियाने देण्यास नकार दिला. तसेच त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर 2024 मध्ये ती बँक बंद झाली. त्यामुळे 14 जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. आता नागरिकांचे लाखो रुपये बँकेत अडकले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शरद पवारांची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल केले जाणार

Spread the love  पुणे : खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार सध्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *