Tuesday , October 15 2024
Breaking News

बेळगाव : लग्न सोहळ्यावर पहिलीच कारवाई; ठोठावला दंड

Spread the love

बेळगाव : अनलॉक झाल्यावर लग्नसमारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल महापालिकेने पहिलीच कारवाई केली. कणबर्गीतील शांती गार्डनमधील लग्न समारंभावर धडक कारवाई करून 2500 रुपये दंड वसूल केला. लग्न समारंभासाठी 100 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे, पण त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. शिवाय, तिथे सोशल डिस्टन्सचे पालनही करण्यात आले नव्हते.
शांती गार्डन येथे सुरू असलेल्या या लग्न समारंभाची माहिती महापालिकेला मिळाल्यानंतर पर्यावरण अभियंते आदीलखान, आरोग्य निरीक्षक पुंडलिक लमाणी यांनी लग्न समारंभासाठी परवानगी घेतली आहे का, याची पडताळणी केली. शहरातील लग्न समारंभांना आधी महापालिकेकडून परवानगी दिली जात होती, पण एप्रिलमध्ये ती जबाबदारी तहसीलदारांकडे देण्यात आली आहे.
लग्नसमारंभासाठी परवानगी देताना तेथे कमाल 100 जण उपस्थित राहायला हवेत, अशी अट घातली जाते, पण त्या अटीचे पालन झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 2500 रूपये दंड भरण्यास सांगण्यात आले. दंडाची रक्कम वसूल करून त्याची रितसर पावतीही देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

Spread the love  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *