Tuesday , March 3 2026
Breaking News

तुरमूरी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) काम करणाऱ्या महिलांना व पुरूषांना मास्क व सॅनिटायझरची बाॅटल वितरण

Spread the love

बेळगांव – बेळगाव तालुक्यातील तुरमूरी ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या तुरमूरी गावातील गणपती मंदिरात – महेश फौंडेशन, श्रमिक अभिवृद्धी संघ व शालीनी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरमूरी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) काम करणाऱ्या सर्व महिलांना व पुरूषांना उच्च दर्जाचे N95 मास्क व प्रत्येक गटाला एक मोठी सॅनिटायझरची बाॅटल वितरीत करण्यात आली.

यावेळी राहुल पाटील यांनी महिलांना येणाऱ्या पावसाच्या कोरोना – काळात सर्वांनी सरकारी मार्गसुचीचे पालन करुन रोजगाराची कामे करावी आणि न घाबरता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे तसेच संकटकाळी रोजगाराच्या महिलांना गरज लागल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. हा कार्यक्रम कायकबंधू – वनिता बांडगे, रेश्मा तंगणकर, सुरेखा कलभंट, लक्ष्मी चलवेटकर, चंदना कलभंट, जयश्री बेळगूंदकर, पूजा जाधव, माधुरी बेळगूंदकर, विद्या डोंबले, कविता तंगणकर, वंदना खांडेकर, आरती बांडगे, पार्वती खांडेकर, सरस्वती तूप्पट, माया तंगणकर, लक्ष्मी जाधव, माया बेळगूंदकर, लक्ष्मी खांडेकर, रेखा डोणकरी, कविता जाधव आणि काही मोजक्या महिलांच्या उपस्थितीत केला गेला. याअगोदर ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या’ वतीने सॅनिटायजरची बाॅटल व N95 मास्क पीडीओ विणा हलवाई यांच्याकडे देण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांकरता N95 मास्क देण्यात आले. याकामी धनश्री नेसरकर, प्रविण नेसरकर, सातेरी कांबळे, सागर बिर्जे व ज्ञानेश्वर पाटील या मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *