खानापूर : डॉक्टर दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथे डॉ.वैभव सुळकर (माचीगड) निडगल येथे डॉ.प्रशांत करंबळकर, ईदलहोंड येथे डॉ.एल.एच.पाटील, डॉ.शिवाजी पाखरे, गणेबैल येथे डॉ.एम.के.कुंभार व डॉ.ऐश्वर्या गोविंदराव पाटील (सिंगीनकोप) यांचा आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, राहुल पाटील, ज्ञानेश्वर सनदी, ब्रह्मानंद मोरे, विश्वनाथ सुतार, दर्शन, सदाशिव पाटील, गणेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta