बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव आणि मराठा युवक मंडळ होसूर यांच्याकडून महाराष्ट्र एकीकरण समिती च्या कोविड सेंटरला ११०००/- रुपये तसेच प्रशांत भातकांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैयक्तिक २१००/- रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केंद्राला देऊ केली.
महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसहभागातून उभारलेल्या कोविड केंद्रामुळे बऱ्याच लोकांची सोय झाली हे कार्य बघून आम्ही प्रभावित झालो आणि आज आर्थिक मदत आम्ही देत आहोत, असे प्रशांत भातकांडे यांनी यावेळी नमूद केले.
सदर मदत शुभम शेळके, मदण बामने, दत्ता जाधव, बाळु जोशी, अंकुश केसरकर, सागर पाटील यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते जोतिबा शहापूरकर, प्रशांत भातकांडे, सोमनाथ सैनुचे, अनिल मुतकेकर, अनंत भातकांडे, प्रताप भातकांडे हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta