बेळगाव : कोरोनाच्या या दुसऱ्या महामारीने भारत देशात थैमान माजले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच अनेक लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.
काकती येथे गेली सहा महिने भटक्या समाजातील एकूण आठ कुटुंबे त्यात एकूण 40 लोक वास्तव्यास आहेत. ते सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रमधून बेळगावात व्यवसायानिमित्त सहकुटुंब आले होते. ते मोबाईल चार्जर, मोबाईल बॅटरी वगैरे विकत होते. हे विकून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. परंतु अचानक कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन झाले आणि त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले.
काकती येथील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर लगेच युवा समिती मार्फत श्री. यशवंत तम्माणाचे आणि अमित कानकुले यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तू कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्याप्रमाणे काकती गावातील युवा समिती कार्यकर्ते आशिष कोचेरी, विनायक केसरकर, गुंडू पाटील यांनी सदर साहित्य त्या कुटुंबापर्यंत पोहचविले. मागील काही दिवसांपासून काकती येथिल युवा समिती चे कार्यकर्ते गावकऱ्यांच्या आणि काही दानशूर व्यक्तींच्या मार्फत गेली महिनाभर यांना जेवण आणि धान्य पुरवत आहेत.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …