मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी राम मंदिराबाबतही मोठा खुलासा केला आहे. पहिल्याच पावसात छतातून गळती लागली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या कामावर बोलताना सांगितले की, जुलै 2025 पर्यंत काम पूर्ण होणे अशक्य आहे, पण तसे बोलले जात असेल तर ते मला मान्य आहे. राम मंदिराच्या बांधकामावरही प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, राम लल्ला गाभाऱ्यात आहेत, तिथे पहिल्याच पावसात पाणी ओले होऊ लागलं आहे, त्याची चौकशी व्हायला हवी.
एका वर्षात मंदिर बांधणे अशक्य
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, जे राम मंदिर बांधण्यात आले आहे, त्यातून पाणी बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही, त्यामध्ये पाणी गळू लागलं आहे. ही समस्या खूप मोठी आहे, ही समस्या आधी सोडवली पाहिजे, असे ते म्हणाले. मंदिराच्या बांधकामाबाबत ते म्हणाले की, मंदिराचे संपूर्ण बांधकाम 2025 मध्ये पूर्ण होईल असे सांगितले जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु ते अशक्य आहे कारण अजून बरेच काही बांधायचे बाकी आहे.
पहिल्या पावसात गळती लागली
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आता पहिल्याच पावसात छतावरून पाणी गळू लागल्याचे राम मंदिराचे मुख्य पुजारी सांगत आहेत.